कौंडण्यपूरबद्दल महत्वाची माहिती.
कौंडण्यपूर गावाचे नांव ऐकताच डोळ्यासमोर भावविश्व उभे राहते. ते पूर्णब्रम्ह भगवान श्रीकृष्णाच्या सासूरवाडीचे स्थान भगवंतांनी याच कौंडण्यपूराहून त्यांची पट्टराणी (अग्रमहिषी) श्री रुख्मिणी हिचे हरण केले होते. विदर्भ राजा भिष्मकाची ती लावण्यवती कन्या होती. राजा भिष्मक कन्या माता रुख्मिणी, प्रभू रामचंद्राची आजी, राजा दशरथाची आई इंदुमती, नलराजाची राणी दमयंती, श्री अगस्ती ऋषीची पत्नी लोपमुद्रा, स्वर्गातून गंगा पृथ्वीवर आणणाऱ्या श्री भगीरथ राजाची माता केशिनी, या पंचमहात्यांचे माहेर तसेच नाथ संप्रदायातील श्री. चौरंगीनाथ या सर्वांचे स्थान कोडप्यपूर होय. वशिष्ता (बरदा) आजची वर्धा नदीच्या पात्रात पुंडलिक नांवाचे कुंड आहे.
कौंडण्यपूर हे प्राचीन विदर्भाची राजधानी असलेले एक ऐतिहासिक आणि पुरातत्त्वीय स्थळ आहे, जे वर्धा नदीकाठी अमरावती जिल्ह्यात आहे . या ठिकाणी असलेले श्री अंबादेवी मंदिर प्रसिद्ध असून, भगवान कृष्णाने येथे रुक्मिणी मातेचे हरण केले अशी आख्यायिका आहे नल- दमयंती विवाह ही याच ठिकाणी झाला होता, तसेच नल आणि दमयंती या पौराणिक पात्रांशीही कौंडिण्यपूरचा संबंध जोडला जातो.
अमरावती जिल्ह्यातील वर्धा नदीच्या काठावर उभ्या असलेल्या या गावात शिरताच सर्वत्र पांढरीच्या (राखेच्या) टेकड्या दिसतात. पांढरीचे टेकडी ही प्राचीन काळच्या मानव जातीच्या अस्तीत्वाचे ठिकाण असते. अशा अनेक टेकड्यावर वसलेल्या या कौंडण्यपूर नगरीचे पुराणवस्तू विभागातर्फे संशोधनाचा अल्पसा प्रयत्न सन १९५९ मध्ये कै. श्री. अ. रा. देशपांडे यांनी केला. सन १९३६ मध्ये पुरातत्व विभागाचे जाणकार रायबहादूर का. ना. दिक्षीत यांनी प्रयत्न केला. १९५९ साली पुण्याच्या डेक्कन कॉलेजच्या पुरातत्व शास्त्र विभागांनी संशोधन केले. त्यानंतर १९६२ ते १९६४ या कालावधीत डॉ. मोरेश्वर दिक्षीत यांनी विस्तृत उत्खनन करून अनेक पुरातत्व अवशेष उघडकीस आणले. इ. स. ५०० पासूनचे अवशेष येथे आढळतात. म्हणजे हे गांव २५०० वर्षे इतके प्राचीन आहे.
रुख्मिणी मातेच्या मंदिरापासून १ कि.मी. अंतरावर उंच टेकडीवर पुरातन जागृत श्री. अंबिका मातेचे प्रवित्र मंदिर उभे आहे. रुख्मिणी मातेस भगवंतांनी याव मंदिरात देवीची ओटी भरविण्यास बोलाविले व जवळच्याच भुयार मार्गांनी रुख्मिणीचे हरण किले. त्यावेळी येथे घनघोर युद्ध झाले व त्यात रुरुमा व शिशुपालचा दारुण पराभव झाला.
या परिसरात असंख्य असे सर्व समाज बांधवांनी बांधलेले पुरातन पवित्र मंदिरे मोठ्या डौलाने उभी आहेत. त्यात श्री. संत रविदास महाराज मंदिर, श्री. संत नरहरी सोनार महाराज मंदिर, श्री. सत्यनारायण भगवान मंदिर, श्री. जैन मंदिर, श्री. शिव मंदिर, श्री. दत्त मंदिर, श्री. प्रभू विश्वकर्माचे मंदिर याशिवाय अनेक छोटी-मोठी देवालयांनी हा परिसर व्यापलेला आहे.
श्री. संत सदगुरु सदाराम महाराजांनी श्रीतिर्थक्षेत्र कौंडण्यपूर ते श्रीतिर्थक्षेत्र पंढरपूर आषाढी पायदळ पालखी सोहळा सन १५९४ साली सुरु केला ती परंपरा आजतागायत अखंड सुरु असुन त्यात २०० ते २५० भाविक भक्त सहभागी होतात. आज या पायदळ दिंडी सोहळ्यास ४३१ वर्षाचा इतिहास आहे. आषाढीला पंढरपूर येथे जाणारी ही महाराष्ट्रातील एकमेव पालखी होय. श्री. रुख्मिणी मातेच्या पालखीला पंढरपुरात विशेष मान आहे. मानाच्या नऊ पालख्यामधील मातेची पालखी असुन ही विदर्भातील एकमेव मानाची पालखी आहे. श्री. संत सदगुरु सदाराम महाराजांना वृद्धापकाळामुळे वारी कठीण ...