सर्व सेवा
ग्राम पंचायतेद्वारे प्रदान केलेल्या सेवांची संपूर्ण यादी
← मुख्यपृष्ठावर परत
प्रमाणपत्रे
जन्म नोंदणी (दाखला)
गावातील जन्म झालेल्या बालकासाठी अधिकृत जन्म प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ही सेवा उपलब्ध आहे.
📝 सोबत प्रक्रिया:
- हॉस्पिटल/डॉक्टरकडून जन्म प्रमाणपत्र घ्यावे
- ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज करावा
- तपासणी करून 7 दिवसांत प्रमाणपत्र दिले जाईल
📋 आवश्यक कागदपत्रे:
- जन्म प्रमाणपत्र (हॉस्पिटल /डॉक्टर)
- आई-वडिलांचे आधार कार्ड
मृत्यू नोंदणी (दाखला)
- गावातील नागरिकांच्या मृत्यूची अधिकृत नोंद करण्यासाठी ही सेवा उपलब्ध आहे.
- https://dc.crsorgi.gov.in
📝 सोबत प्रक्रिया:
- मृत्यूची माहिती संबंधित व्यक्ती किंवा कुटुंबियांनी ग्रामपंचायत कार्यालयास २१ दिवसाच्या आत कळवावी.
- आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावा
- तपासणीनंतर प्रमाणपत्र देण्यात येईल
📋 आवश्यक कागदपत्रे:
- वैद्यकीय मृत्यू प्रमाणपत्र, कुटुंब ओळखपत्र, अर्जदाराचा ओळख पुरावा
विवाह नोंदणी (दाखला)
- लग्नाचे अधिकृत नोंदणी व विवाह प्रमाणपत्र मिळविण्यासाठी ही सेवा उपलब्ध आहे.
- https://mahaegram.co.in
📝 सोबत प्रक्रिया:
- विवाहानंतर दोन्ही पक्षांनी संयुक्त अर्ज भरावा.
- आवश्यक कागदपत्रांसह ग्रामपंचायतीकडे सादर करावा.
- तपासणी व पडताळणीनंतर प्रमाणपत्र दिले जाईल.
📋 आवश्यक कागदपत्रे:
- विवाहाचे दस्तऐवज (लग्न प्रमाणपत्र / फोटो पुरावा), दोन्ही पक्षांचे ओळखपत्र, दोन साक्षीदारांची ओळखपत्रे.