सर्व सेवा

ग्राम पंचायतेद्वारे प्रदान केलेल्या सेवांची संपूर्ण यादी

← मुख्यपृष्ठावर परत

प्रमाणपत्रे

📄

जन्म नोंदणी (दाखला)

गावातील जन्म झालेल्या बालकासाठी अधिकृत जन्म प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ही सेवा उपलब्ध आहे.

https://dc.crsorgi.gov.in


📝 सोबत प्रक्रिया:
  • हॉस्पिटल/डॉक्टरकडून जन्म प्रमाणपत्र घ्यावे
  • ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज करावा
  • तपासणी करून 7 दिवसांत प्रमाणपत्र दिले जाईल
📋 आवश्यक कागदपत्रे:
  • जन्म प्रमाणपत्र (हॉस्पिटल /डॉक्टर)
  • आई-वडिलांचे आधार कार्ड


💰
शुल्क: ₹50
⏱️
कालमर्यादा: ७ कार्यदिवस
👤
पदनिर्देशित अधिकारी: ग्रामसेवक
📋

मृत्यू नोंदणी (दाखला)

  • गावातील नागरिकांच्या मृत्यूची अधिकृत नोंद करण्यासाठी ही सेवा उपलब्ध आहे.
  • https://dc.crsorgi.gov.in


📝 सोबत प्रक्रिया:
  • मृत्यूची माहिती संबंधित व्यक्ती किंवा कुटुंबियांनी ग्रामपंचायत कार्यालयास २१ दिवसाच्या आत कळवावी.
  • आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावा
  • तपासणीनंतर प्रमाणपत्र देण्यात येईल


📋 आवश्यक कागदपत्रे:
  • वैद्यकीय मृत्यू प्रमाणपत्र, कुटुंब ओळखपत्र, अर्जदाराचा ओळख पुरावा
💰
शुल्क: ₹50
⏱️
कालमर्यादा: ७ कार्यदिवस
👤
पदनिर्देशित अधिकारी: ग्रामसेवक
📋

विवाह नोंदणी (दाखला)

  • लग्नाचे अधिकृत नोंदणी व विवाह प्रमाणपत्र मिळविण्यासाठी ही सेवा उपलब्ध आहे.
  • https://mahaegram.co.in
📝 सोबत प्रक्रिया:
  • विवाहानंतर दोन्ही पक्षांनी संयुक्त अर्ज भरावा.
  • आवश्यक कागदपत्रांसह ग्रामपंचायतीकडे सादर करावा.
  • तपासणी व पडताळणीनंतर प्रमाणपत्र दिले जाईल.
📋 आवश्यक कागदपत्रे:
  • विवाहाचे दस्तऐवज (लग्न प्रमाणपत्र / फोटो पुरावा), दोन्ही पक्षांचे ओळखपत्र, दोन साक्षीदारांची ओळखपत्रे.


💰
शुल्क: ₹20
⏱️
कालमर्यादा: १५ कार्यदिवस
👤
पदनिर्देशित अधिकारी: ग्रामसेवक